Menu Close

पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. रघुनाथ ढोबळे

पेठ (ता. आंबेगाव) – येथील श्रीदत्त मंदिरात मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सध्या समाजात ‘प्रेम’ आणि ‘मैत्री’ यांच्या गोंडस नावाखाली हिंदु मुलींची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे पालक आणि मुली यांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. रघुनाथ ढोबळे यांनी मांडले. भारतातील नागालँड राज्यात ‘सुमिय’ नावाची नवीन नागा जमात ‘लव्ह जिहाद’मुळे निर्माण झाली आहे. यातून ‘लव्ह जिहाद’चे भीषण वास्तव आणि धर्माचरणाची आवश्यकता त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. हिंदूंमध्ये जनजागृती होण्यासाठी गावोगावी अशी व्याख्याने आयोजित करण्याची मागणी उपस्थितांनी केली.

या कार्यक्रमाला पेठच्या ग्रामपंचायत सदस्या अर्चनाताई बुट्टे, श्री दत्तमंदिराचे विश्वस्त श्री. साहेबराव शिंदे, ह.भ.प. सोनालीताई बुट्टे आणि आदिनाथ संप्रदायाचे गुरुवर्य वसंतबाबा इचके उपस्थित होते. कार्यक्रमाला अनेक जणांची उपस्थिती लाभली.

Latest News