सोलापूर येथील शासकीय महिला ‘आयटीआय’मधील ‘प्रशासकीय जिहाद’चे प्रकरण

मुंबई – सोलापूर येथील शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (‘आयटीआय’मध्ये) अनुमाने १५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा प्रशासकीय जिहाद आणि संस्थात्मक छळ यांच्या माध्यमातून मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि धार्मिक छळ होत असल्याच्या प्रकरणाची विशेष अन्वेषण पथकाच्या (‘एस्.आय.टी.’च्या) माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या विधान परिषदेतील आमदार तथा मुख्य प्रतोद प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
या निवेदनाची गंभीर नोंद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश दिला.
हिंदु जनजागृती समितीने या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. समितीने उपलब्ध पुरावे, पीडित विद्यार्थिनी आणि कर्मचारी यांच्या तक्रारी आणि संबंधित कागदपत्रांसह प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांना सविस्तर निवेदन दिले होते.
प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात शासकीय महिला आयटीआयच्या मुसलमान गटनिदेशक श्रीमती रमेजा कंपली यांच्या कार्यपद्धतीमुळे संस्थेमध्ये शिक्षण घेणार्या १५० हिंदु विद्यार्थिनी आणि तेथे कार्यरत ९ हिंदु कर्मचारी यांचा संस्थात्मक अन् प्रशासकीय पद्धतीने मानसिक, शारीरिक, आर्थिक, तसेच धार्मिक छळ केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांना विविध प्रकारे त्रास देऊन संस्थेतून बाहेर पडण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, संस्थेतील विद्यार्थिनींची वैयक्तिक माहिती स्थानिक मुसलमान व्यक्तींना पुरवून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींचा छळ केला जात आहे. तसेच कायमस्वरूपी कार्यरत असलेल्या कर्मचार्यांकडून वेतन देतांना प्रत्येकी १ ते ३ सहस्र रुपये अनधिकृतरित्या वसूल करून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. या सर्व प्रकारांविषयी २७ मार्च २०२६ या दिवशी कौशल्य विकास विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पीडितांनी आत्मदहनाची चेतावणीही दिली.
प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी संबंधित मुसलमान गटनिदेशक श्रीमती रमेजा कंपली यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिला.
सोलापूर येथील ‘कॉर्पोरेट जिहाद’: १५० हिंदु विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ केल्याचे उघड
सोलापूर येथील शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘कॉर्पोरेट जिहाद’

सोलापूर – येथील ‘शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’त (‘आयटीआय’मध्ये) ‘कॉर्पोरेट जिहाद’चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेतील १५० विद्यार्थिनी आणि ९ हिंदु कर्मचारी यांचा शारीरिक, मानसिक आणि धार्मिक छळ झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात कर्मचार्यांनी २७ मार्च २०२६ या दिवशी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनानुसार आरोपांची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली असून या समितीच्या पथकाने नुकतीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाला भेट दिली.
‘लव्ह जिहाद’चे जाळे आणि विद्यार्थिनींचा बुद्धीभेद !
संस्थेतील मुसलमान गटनिर्देशक रमेजा कंपली हिने रुखसार शेख नामक महिलेची नियमबाह्य पद्धतीने तासिका तत्त्वावर नियुक्ती केली. ही रुक्सार शेख विद्यार्थिनींना ‘प्रेम करा, पालकांनी विवाहाला अनुमती दिली नाही, तर स्वतःचे हात कापून घ्या’, अशी अत्यंत विकृत आणि प्रक्षोभक शिकवण देत होती. विद्यार्थिनींनी स्वतः माध्यमांसमोर रडत याविषयी साक्ष दिली आहे की, महाविद्यालयात प्रेमाचे धडे दिले जात होते. याव्यतिरिक्त रमेजा हिने हिंदु विद्यार्थिनींची नावे वेगवेगळ्या मुलांसमवेत जोडून त्यांची अपकिर्ती केली. हिंदु विद्यार्थिनींची नावे ज्यांच्याशी जोडण्यात आली होती, ते बहुतांश मुसलमान असल्याचा आरोप आहे.
या संदर्भात ‘सकल हिंदु समाजा’ने उच्चस्तरीय मुख्य कार्यालयीन चौकशी समितीच्या अध्यक्षांना निवेदन दिले आहे.
धार्मिक भेदभाव आणि हिंदु विद्यार्थिनींचा जाणीवपूर्वक छळ !
संस्थेत अत्यंत विषारी धार्मिक वातावरण निर्माण केले गेले. ‘पार्लर ट्रेड’च्या (एक व्यावसायिक अभ्यासक्रम) एका विद्यार्थिनीला ताप आला म्हणून सुटी हवी होती. तेव्हा तिला तिच्या कुंकू लावण्यावरून ‘तू कुंकू लावतेस, तू आजारी असू शकत नाही’, अशी हिंदु धर्मविरोधी आणि अपमानास्पद टिपणी रमेजा यांनी केली. मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना स्वच्छतागृहाचा वापर करता येऊ नये, यासाठी ‘पाणी अल्प प्या’, असा अमानवीय सल्ला दिला जात होता. रमेजा मुसलमान विद्यार्थिनींना हिंदु शिक्षकांविरुद्ध भडकवत होत्या.
अतिरिक्त मुख्य सचिवांना दिलेल्या तक्रारीतून लक्षात आलेल्या गोष्टी
१. हिंदु कर्मचार्यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन पदावरून काढण्यात आले आणि त्यांच्या जागी कोणत्याही विज्ञापनाविना किंवा अनुभवाविना मुसलमान समुदायाच्या व्यक्तींची अवैध भरती करण्यात आली.
२. कायमस्वरूपी कर्मचारी श्रीमती स्वाती पुकाळे यांना जाणीवपूर्वक त्रास देऊन हाकलून लावले. ‘टी.डब्लू.पी.टी.’ (टेक्सटाइॅल वेट प्रोसेसिंग टेक्निशिअन – एक व्यावसायिक अभ्यासक्रम) या शाखेचे पद रिक्त होताच विज्ञापन न देता अनुभव नसतांनाही श्रीमती नाहिद शेख यांची भरती केली गेली. ‘फ्रूट अँड व्हेजिटेबल ट्रेड’चा अनुभव नसतांना अलमास शेख यांची भरती केली गेली.
३. तासिका कर्मचारी तमन्ना शेख या ५ महिने कामावर अनुपस्थित असूनही तिथे हिंदु व्यक्तीची नेमणूक होऊ नये; म्हणून ५ महिने मुलींना त्यांच्याकडील विषय शिकवलाच नाही आणि नंतर तिथेही मुसलमान व्यक्तीचीच भरती केली गेली.
४. प्रवेश प्रमुख असल्याचा अपलाभ घेत रमेजा नावाच्या शिक्षिका हिंदु मुलींना प्रवेशाची पूर्ण माहिती देत नाहीत, तर मुसलमान मुलींना प्राधान्य देऊन आरीफ शेख यांच्या वर्गात त्यांना वेगळे बसवून शिकवले जाते.
५. कर्मचार्यांच्या देयकांवर स्वाक्षरी करण्यासाठी श्रीमती रमेजा यांच्याकडून प्रत्येक महिन्याला १ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली जाते.
६. शासनाकडून प्रात्यक्षिक करण्यासाठी कच्चा माल विनामूल्य मिळत असतांनाही रमेजा आणि इतर मुसलमान कर्मचारी विद्यार्थिनींना बलपूर्वक आणि बाजारभावापेक्षा अधिक दराने गणवेश कापड आणि कपडे सिद्ध करण्याचे साहित्य घेण्याची सक्ती करत.
७. स्वच्छता कर्मचारी अर्चना जाधव यांना काढून जाकिर सुलेमान यांना भरती केले. विरोधामुळे अर्चना जाधव यांना पुन्हा घेतले असले, तरी आता त्यांना भयंकर मानसिक त्रास दिला जात आहे.
८. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र शासनाने महिला महाविद्यालये आणि शाळा यांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी केवळ महिला स्वच्छता कर्मचारी नेमण्याचा कठोर आदेश दिला आहे. असे असतांना श्रीमती रमेजा यांनी हिंदु महिला स्वच्छता कर्मचार्याला कामावरून काढून एका मुसलमान पुरुषाची मुलींच्या संस्थेत स्वच्छता कामगार म्हणून नेमणूक केली. ही गोष्ट विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि प्रशासकीय हलगर्जीपणाची आहे.
९. श्रीमती रमेजा प्रत्येक महिन्याला ४ दिवस शैक्षणिक कामकाज बंद ठेवून १५० विद्यार्थिनींकडून झाडणे, पुसणे आणि झुडपे तोडणे अशी कष्टाची कामे बलपूर्वक करून घेत होत्या. यात अनेक मुलींना इजा होणे, चक्कर येणे असे प्रकार घडले आहेत. एखादी मुलगी विरोधात बोलली, तर तिचा घरापर्यंत पाठलाग करून धमक्या दिल्या गेल्या.
१०. तत्कालीन प्राचार्य श्री. अमर जाधव यांनी या अवैध कृत्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला असता रमेजा यांच्या पतीने त्यांना जिवे मारण्याची आणि अंगावर ट्रक घालण्याची धमकी दिली अन् त्यांना संस्थेतून हाकलून लावले. सध्या ज्या मुलींनी आवाज उठवला आहे, त्यांच्याविरुद्धही गुन्हे नोंदवण्याच्या धमक्या देऊन दबाव आणला जात आहे.








