गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्यांकडे मागणी

पणजी– गोव्यातील अनेक नाईट क्लब्स, ‘रिव्हर क्रूझ’ आदी ठिकाणी होळीच्या पार्श्वभूमीवर ‘होळी पार्ट्यां’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘रेन डान्स’, ‘पूल पार्टी मॅडनेस’, ‘बॉलीवूड डिजे’, ‘इंडियन ढोल डान्स’ आदींचा समावेश करण्यात आला आहे. ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’ या पार्टीमध्ये बिअरचा अमर्यादित पुरवठा केला जाणार आहे, तसेच निरनिराळे मद्यही पुरवले जाणार आहे. या ठिकाणी ८ वर्षांवरील मुलांना सहभागी होता येणार आहे. यामुळे हिंदूंच्या पवित्र होळी सणाची चुकीची ओळख निर्माण होणार आहे. या पार्ट्या त्वरित थांबवण्याची मागणी उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रशांत परब यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे हिंदु जनजागृती समितीने केली आहे. या वेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक, ‘रणरागिणी’च्या सौ. राजश्री गडेकर, सौ. शुभा सावंत, सौ. हेमश्री गडेकर आणि श्री. दिलीप शेट्ये यांची उपस्थिती होती.
Following a complaint by #Hindu Janajagruti Samiti, the North #Goa District Administration has ordered verification of whether Holi parties at nightclubs and river cruises have obtained mandatory permissions and safety clearances. Authorities have also directed strict action… pic.twitter.com/qReDpkmOTo
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) February 28, 2026
दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा संदेश देणारा हा उत्सव आहे; मात्र या पवित्र सणाला गालबोट लावण्याचा प्रकार गोव्यातील काही नाईट क्लब्सकडून केला जात आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेशी निगडित सणाचे व्यापारीकरण करणे अयोग्य आहे. यामुळे तरुण पिढीसमोर होळी सणाची चुकीची प्रतिमा निर्माण होत आहे. हडफडे येथील नाईट क्लबमधील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘होळी पार्ट्यां’चे ओयोजन करणार्या नाईट क्लब्सकडे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक परवाने आहेत का ? याचीही चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अल्पवयिनांना सहभागी होण्यास अनुमती देणार्यांवर कारवाई करण्याची मागणी
अमर्याद बिअर पुरवली जाणार्या ‘हयात सेंट्रीक होळी बॅश’मध्ये अल्पवयिनांना सहभागी होण्यास अनुमती दिल्याबद्दल आयोजकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची प्रत महिला आणि बालकल्याण संचालिका सौ. ज्योती देसाई यांनाही देण्यात आली आहे.







