
फरीदाबाद (हरियाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने ‘जीव कल्याण संस्था’ येथे १६ मार्च या दिवशी सेक्टर १९ मध्ये एका योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत योगाच्या माध्यमातून आरोग्य आणि आत्मविकास कसा साधायचा, यावर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच विविध योग तंत्रे अन् प्राणायाम यांचे प्रशिक्षणही देण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश ‘लोकांना योगाच्या लाभांविषयी जागरूक करणे आणि त्यांना निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रेरित करणे’, हा होता.
या कार्यशाळेत समाजातील अनेकांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचा आनंद आणि उत्साह वाढला.
क्षणचित्र

‘जीव कल्याण संस्थे’चे महासचिव श्री. प्रल्हाद गर्ग यांनी या कार्यशाळेच्या आयोजनात सहकार्य केले.


