हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्वरी अधिष्ठान हवे – अतुल अर्वेन्ला, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, नागपूर

नागपूर (महाराष्ट्र) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ईश्वरी अधिष्ठान आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे साधना करणे काळाची आवश्यकता आहे, असे विचार हिंदु जनजागृती समितीचे नागपूर समन्वयक श्री. अतुल अर्वेन्ला यांनी मांडले.
श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तुकडोजीनगर, नरसाळा रोड येथील श्री हनुमान मंदिरामध्ये ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधनेची आवश्यकता’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला संबोधित करतांना ते बोलत होते. या व्याख्यानाला परिसरातील धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी श्री. अर्वेन्ला यांनी आध्यात्मिक साधनेचे महत्त्व सांगितले, तसेच राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना गुरुपरंपरेने धर्मसंस्थापनेसाठी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी साधनेविषयी शंकानिरसन करून घेतले. प्रत्येक मासाला अशाच प्रकारे व्याख्यान आयोजित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले, तसेच भविष्यातील कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेऊ, असेही काहींनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन प्रयत्न केले.
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त सनातन संस्थेचे चैतन्यमयी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने रेशीमबाग, नागपूर येथील श्री संत गजानन महाराज मंदिर, तसेच उमरेड येथील नागपूर रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे सनातनचे चैतन्यमयी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये अध्यात्म, साधना, राष्ट्र, धर्म, संस्कार आणि जीवनमूल्ये यांवर आधारित ग्रंथांसह सात्त्विक उत्पादने ठेवण्यात आली होती. अनेक जिज्ञासूंनी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घेतली, तसेच सनातनच्या ग्रंथांचा लाभ घेतला. या सेवेत सत्संगातील जिज्ञासूंनी सहभाग घेतला.


