-
भाविकांना शेंगदाणा चटणीचेही वाटप
-
महाराष्ट्र मंदिर महासंघाचाही सहभाग

जेजुरी (पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मार्गावर जेजुरी येथे हिंदु जनजागृती समिती आणि ‘डॉ. प्रसाद खंडागळे मित्रपरिवार’ यांच्या वतीने विठ्ठलभक्तांसाठी विनामूल्य आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली. या वेळी भाविकांना विनामूल्य शेंगदाणा चटणीच्या पाकिटांचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमात महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि कै. सुधाकर उपाख्य वामन अंबादास खंडागळे अध्यासन यांनीही सहभाग घेतला. वारकरी भाविकांचे कक्षाद्वारे हिंदु जनजागृती समिती आणि डॉ. प्रसाद खंडागळे मित्रपरिवार यांच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचा कक्ष मल्हार देवस्थानाच्या शेजारीच मुख्य रस्त्यावर होता. या वेळी मोठ्या संख्येत भाविकांनी विनामूल्य औषधांचा लाभ घेतला. औषधोपचार आणि शेंगदाणा चटणी वाटपाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी कक्षावर पुष्कळ गर्दी केली होती.


