हिंदु संघटनांच्या वतीने पोलीस महासंचालकांना निवेदन !

बेंगळुरू (कर्नाटक) – २७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत. पोलिसांनी मध्यरात्रीच हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांना गुन्हेगारांसारखे वागवणे, हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवणे, अशी कृत्ये पोलीस करत आहेत. १५ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे; मात्र द्वेषपूर्ण भाषणे देणार्या ‘एस्.डी.पी.आय.’च्या धर्मांध नेत्यांवर कोणताही गुन्हा नोंदवला जात नाही. जातीय हिंसाचार प्रतिबंधक पथकाचा वापर केवळ हिंदु संघटनांच्या विरोधात केला जात आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी व्यक्त केले. २ जून २०२५ या दिवशी राज्याचे पोलीस महासंचालक एम्.ए. सलीम यांना समस्त हिंदु संघटनांच्या वतीने निवेदन दिल्यानंतर श्री. गौडा बोलत होते. या वेळी श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, अधिवक्ता अमृतेश एन.पी., श्री. पुनीत केरेहळ्ळी, श्री. संतोष केंचांब, बजरंग दलाचे प्रांत सहसंयोजक श्री. गोवर्धन सिंह, विश्व हिंदु परिषदेचे प्रांत सहसचिव श्री. सुरेश कुमार बी., हिंदु जागरण वेदिकेचे दक्षिण प्रांत सहसंयोजक श्री. राजण्णा यांच्यासह अनेक हिंदु कार्यकर्ते उपस्थित होते.
The federation also strongly opposed the ongoing conspiracy to target Hindu leaders in Dakshina Kannada district and urged the authorities to provide protection to Hindu leaders.
— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@MohanGowda_HJS) June 2, 2025
१. श्री. मोहन गौडा पुढे म्हणाले की, सुहास शेट्टी हत्या प्रकरणात प्रतिबंधित ‘पीएफ्आय’ या संघटनेचे सदस्य सहभागी असल्याचा संशय आहे; परंतु पोलीस या प्रकरणात योग्य अन्वेषण न करता अनेक धार्मिक आणि राजकीय नेते यांच्या दबावामुळे हिंदु नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवत आहेत.
ಹಿಂದೂ ಸಂಘಟನೆಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ವತಿಯಿಂದ ಡಿಜಿ ಮತ್ತು ಐಜಿಪಿ ಪೊಲೀಸ್ ಮಹಾನಿರ್ದಶಕರು ಕರ್ನಾಟಕ ಅವರಿಗೆ ಮಂಗಳೂರು ಗಲಭೆ ಮತ್ತು ಹಿಂದೂ ಮುಖಂಡರಿಗೆ ಜೀವ ಬೆದರಿಕೆ ಮತ್ತು ಅನವಶ್ಯಕವಾಗಿ ಎಫ್ಐಆರ್ ದಾಖಲು ಮಾಡುತ್ತಿದ್ದು ಇದನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಬೆಂಗಳೂರು ಕರ್ನಾಟಕ ಪೊಲೀಸ್ ಮಹಾನಿರ್ದೇಶಕರು ರವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು.#DG #IGP #PramodMutalik pic.twitter.com/Avl9x3V8Oh
— Pramod Mutalik Official (@PramodMuta39880) June 2, 2025
२. श्री. प्रमोद मुतालिक यांनी सांगितले, ‘दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अनेक हिंदु नेत्यांना ‘जैश-ए-महंमद’ या आतंकवादी संघटनेच्या नावाने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया येथून धमक्या मिळत आहेत. ‘पीएफ्आय’चे सदस्य अजूनही सक्रीय असून ते ‘एस्.डी.पी.आय.’च्या माध्यमातून काम करत आहेत. सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
उपस्थित अन्य हिंदु संघटनांचे प्रमुख मान्यवर –
१. श्री. एम्.एल्. शिवकुमार, हिंदु नेते, विजयनगर
२. श्री. मल्लिकार्जुन राजू, संस्थापक, युथ फॉर ह्युमन राईट्स, कर्नाटक
३. श्री. सुरेश, सचिव, आझाद ब्रिगेड, रामनगर
४. श्री. सुंद्रेश नरगल, सरचिटणीस, श्रीराम सेना, बेंगळुरू
५. अधिवक्ता प्रसन्ना डी.पी., कर्नाटक उच्च न्यायालय
६. अधिवक्ता जी.एम्. नटराज, कर्नाटक उच्च न्यायालय
७. श्री. दीपक पवार, शिव गर्जना सेना, बेंगळुरू







