जीवन आदर्श बनण्‍यासाठी योग्य आदर्श निवडा !

मुलांनो राष्ट्रदोह करणा-यांचा आदर्श समोर ठेवण म्हणजे राष्ट्रद्रोही कृत्यांना पाठिंबा देण्यासारखे आहे त्यामुळे भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ, संत ज्ञानेश्वर यांसारख्या थोर विभूतींचा आदर्श ठेऊन आपण आपले आचरण करायला हवे. Read more »

आपला अमूल्य वेळ खर्च करणाऱ्या दूरचित्रवाहिनीच्या राक्षसाला दूर ठेवा !

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अतिप्रिय असणारी दूरचित्रवाणी बघण्यात तुम्ही आयुष्याचा किती वेळ घालवता याची तुम्हाला कल्पना आहे का? दूरचित्रवाणी एक राक्षस आहे, तुमचे डोळे बिघडवणारा, तुमचे विचार खुंटवणारा, तुमची मती मंद करणारा…! तुमच्या मर्यादित आयुष्याचा बहुमूल्य वेळ त्याच्या स्वाधीन करणार आहात का ? Read more »

करमणूक गीतांपेक्षा देवभक्‍ती अन् राष्‍ट्रभक्‍ती वाढवणारी गीते ऐकावीत आणि म्‍हणावीत !

सध्‍याची मुले चित्रपट आणि ‘अल्‍बम्‍स्’ यांतील गाणी ऐकतात. काही मुले ही गाणी पाठ करून म्‍हणतही असतात. अश्या करमणूक गीतांचा साधना, तसेच राष्‍ट्र अन् धर्म यांच्‍या कार्याच्‍या दृष्‍टीने काहीच उपयोग नसल्‍याने मुलांचा जीवनातील अमूल्‍य वेळ फुकट जातो. त्यापेक्षा मुलांनी स्‍वतःमध्‍ये राष्‍ट्र अन् राष्‍ट्राभिमान निर्माण होण्‍याच्‍या उद्देशाने विविध देशभक्‍तीपर गीते म्‍हणण्‍यास शिकावे. Read more »

मुलांनो, या चांगल्या सवयी बाणवा !

मुलांनो, आपल्या सवयी या आपल्या व्यक्तीमत्त्वाच्या दर्शक असतात. चांगले व्यक्तीमत्त्व सर्वांनाच आवडते; म्हणूनच पुढे दिलेल्या चांगल्या सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न करा ! Read more »

निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचे विचार करणे, हा वेडेपणा !

आजकाल विद्यार्थी केवळ परीक्षेतील अपयश आणि अभ्यासाचा ताण यांमुळेच नाही, तर आई-वडिलांचे कडक बोलणे आदी कारणांमुळेही विद्यार्थी सर्रास आत्महत्या करतात ! ‘आत्महत्या करणे’, हा काही समस्येवरील उपाय नव्हे, उलट तो तर शुद्ध पळपुटेपणाच आहे. आत्महत्येच्या विचारापासून मनाला परावृत्त करण्यासाठी काय करावे हे या लेखात पाहूया. Read more »

मुलांनो, सुट्टी सार्थकी कशी लावाल ?

‘विद्यार्थीमित्रांनो, आता तुमची परीक्षा संपून सुट्टी चालू झाली आहे. या सुट्टीत मजा करायचीच; पण नवीन गोष्टीही शिकायच्या आहेत. ‘ही सुट्टी आनंदात जावी’, असेच आपल्याला वाटते ना ? मग मित्रांनो, हे वाचाच….. Read more »

परीक्षेतील अपयशाच्या कारणांवर उपाय योजावेत !

नियमित अभ्यास करूनही तुम्हाला परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, तर वाईट वाटून घेऊ नका. अपयशाच्या कारणांचा अवश्य विचार करून त्यांच्यावर उपायही काढा. अपयशाची काही नेहमीची कारणे आणि त्यांवर योजावयाचे उपाय पुढे दिले आहेत. Read more »

‘काटकसर’ या गुणाचा संस्कार अंगवळणी आणा !

देवाच्या कृपेने मानवाला अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांची उधळपट्टी टाळून आवश्यक तेवढाच वापर करणे, यालाच ‘काटकसर’ म्हणतात. आई-बाबा तुम्हाला हव्या त्या वस्तू आणून देतात; म्हणून आज तुम्हाला पैशांचे इतके मोल वाटत नाही. यासाठी ‘काटकसर’ या गुणाचा संस्कार तुमच्या मनावर आतापासूनच नको का व्हायला ? Read more »

आई-वडिलांची सेवा मनापासून करा !

‘मातृदेवो भव । पितृदेवो भव ।’ म्हणजे ‘माता-पिता हे देवासमान आहेत’, अशी आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे. `आई-वडील व गुरु यांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे’. मुलांनो, पुंडलिक आणि श्रावणबाळा यांचा आदर्श समोर ठेवून आपणही आई-वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन भावाने सेवा-शुश्रुषा करणे, हे आपले कर्तव्यच आहे. Read more »