मुलांनो, या चांगल्या सवयी बाणवा !


अ. खोकतांना आणि शिंकतांना तोंडावर / नाकावर रूमाल धरावा.

आ. मार्गावर (रस्त्यावर) थुंकू नये किंवा घाण टाकू नये.

इ. मिळालेला खाऊ सर्वांना वाटावा, म्हणजे स्वतःच्या सुखात इतरांनाही सहभागी करून घ्यावे.

ई. दिलेला शब्द आणि दिलेली वेळ यांचे पालन करावे.

उ. घरातून बाहेर पडतांना प्रत्येक वेळी देवतांना नमस्कार करावा आणि मोठ्या व्यक्तींना ‘कोठे जात आहे’, ते सांगावे.

ऊ. कोणी भेटल्यावर हसतमुखाने नमस्कार करावा. सर्वांशी नम्रतेने वागावे.

ए. वयाने मोठ्या असलेल्या व्यक्ती, तसेच विद्वान आणि संत यांचा आदर करावा.

ऐ. दोन मोठी माणसे बोलत असतांना मध्येच बोलू नये.

ओ. मोठ्या माणसांसमोर आसंदीत (खुर्चीत) किंवा उंच आसनावर बसू नये.

औ. कोणाची चेष्टा किंवा निंदा करू नये.

अं. सर्वांशी प्रेमाने वागावे आणि आवश्यकतेनुसार त्यांना साहाय्य करावे.

क. कोणाचे वाईट चिंतू नये किंवा कोणाला दुःख देऊ नये.

ख. स्वतःला मिळालेले ज्ञान इतरांनाही द्यावे; कारण ज्ञान दिल्याने ते वाढते.