जीवन आदर्श बनण्‍यासाठी योग्य आदर्श निवडा !

१. आजकालच्या बहुतांश मुलांचे चुकीचे आदर्श – चित्रपट अभिनेते आणि खेळाडू !

राष्ट्रद्रोहासारख्या कृत्यांमध्ये सहभागी असणारे काही अभिनेते आणि खेळाडू !

बहुतांश मुलांचे आदर्श असणारे अभिनेते आणि खेळाडू मंडळी प्रत्यक्ष जीवनात कसे चुकीचे वागतात, याची काही उदाहरणे पाहूया.

अ. एका अभिनेत्याच्या घरी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अवैधरित्या ठेवलेली एके-४७ ही बंदूक सापडली होती. या प्रकरणी त्याला टाडा न्यायालयाने दोषी ठरवले होते.

आ. एका अभिनेत्याने वनातील हरिणाची अवैध पारध (शिकार) केली होती. तसेच त्याने मद्यधुंद होऊन चारचाकी गाडी चालवल्याने झालेल्या अपघातात एक नागरिक मरण पावला होता.

इ. एका अभिनेत्याने अनिवासी भारतीय असल्याचे दाखवून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडवला.

ई. एका क्रिकेटपटूने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हिंदुस्थानच्या राष्ट्रध्वजाचे चित्र असलेला केक कापला.

मुलांनो, असा राष्ट्रद्रोह करणार्‍यांचा आदर्श समोर ठेवणे, म्हणजे त्यांच्या राष्ट्रद्रोही कृत्यांना पाठिंबा देण्यासारखेच आहे, हे लक्षात ठेवा !

२. मुलांनी कोणाचा आदर्श समोर ठेवावा ?

कित्येक जण उच्च शिक्षण घेऊन केवळ पैसा, गाडी आणि बंगला मिळवतात अन् एक दिवस सर्वसामान्यांप्रमाणे मरून जातात; परंतु काही जण शिक्षण घेऊन त्याचा उपयोग राष्ट्र आणि धर्म यांसाठी करतात. तन-मन-धन, तसेच प्रसंगी प्राण अर्पण करून अमर होतात. मुलांनो, तुमचे आदर्श पुढीलप्रमाणे असावेत.

१. असह्य संकटे झेलूनही देवाचा नामजप न सोडणारा : भक्त प्रल्हाद

२. तप करून अढळपद प्राप्त करून घेणारा : ध्रुवबाळ

३. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्‍वरी हा जगन्मान्य धर्मग्रंथ लिहिणारे : संत ज्ञानेश्‍वर

मुलांनो, राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी जीवन जगणार्‍यांचे जीवनच खर्‍या अर्थाने आदर्श बनते. तुम्‍हीही नटनट्या, खेळाडू आदींचा आदर्श समोर ठेवण्‍यापेक्षा राष्‍ट्रपुरुष, क्रांतीकारक, संत आदींचा आदर्श समोर ठेवून हिंदुस्‍थानला सुसंस्‍कृत, आदर्श आणि बलशाली बनवा !

Leave a Comment