‘क्रांतीपक्षाचे उग्र आंदोलन लोकपक्षाच्या पाठीशी नसेल, तर लोकपक्ष हा अखेरीस मवाळांचा मेळावा ठरून शत्रूवर योग्य तेवढे दडपण आणण्यास असमर्थ ठरतो. ही जोड जमवावीच लागते. ती जमल्याशिवाय कार्यसिद्धी होऊ शकत नाही. टिळकांजवळ ही समन्वयाची दृष्टी होती. वेळप्रसंग पाहून सर्व मार्ग हाताळण्याची चतुरस्रता होती. एकीकडे ते स्वच्छ म्हणत, ‘‘कोणतीही चळवळ लोकांच्या अनुकूलतेखेरीज सिद्धीस जात नाही. लोक अनुकूल नसल्यास एकटा पुढारी फशी पडतो.’’ तर दुसरीकडे क्रांतीकारकांना पाठीशी घालण्याचे, खाडिलकरांना नेपाळात पाठवून बाँबच्या कारखान्याच्या दृष्टीने काही हालचाल करण्याचे, सैनिकीकरणाचा जोरदार पुरस्कार करण्याचे त्यांचे उद्योगही चालूच असत. मवाळांचे वाटाघाटीचे मार्गही त्यांनी कधी वर्ज्य मानले नाहीत, तसेच वेळप्रसंगी लोकांची तशी ५० टक्के जरी सिद्धता दिसली, तरी सशस्त्र बंडाचा पर्याय नजरेआड केला नाही.’
– श्री. ग. माजगावकर (‘स्वातंत्र्यवीर’ दीपावली विशेषांक नोव्हेंबर- डिसेंबर २००७ पृष्ठ २२-२३)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाचा इतिहास !
क्रांतीकारकांची वैशिष्ट्ये !
स्वातंत्र्यप्राप्तीच्या सर्वोच्च ध्येयाने आनंदाने मृत्यूला कवटाळणारे क्रांतीकारक !
ऐन तारुण्यात क्रांतीकारकांनी देशासाठी केलेले क्रांतीकार्य आणि दिलेले बलीदान विसरू नका !
क्रांतीकारकांनी केलेल्या बाँबस्फोटाचे लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून केलेले समर्थन !
क्रांती अपरिहार्य कधी होते, यासंदर्भात भगतसिंगाचे विचार