क्रांती अपरिहार्य कधी होते, यासंदर्भात भगतसिंगाचे विचार

‘लहानपणी भगतसिंगाचे मन धर्मभावनांनी प्रभावित झालेले होते. पुढे कोवळ्या तारुण्यातच तो गांधीवादी राष्ट्र्रभक्तीकडून क्रांतीकारक झुकला. पुढे अठरा ते वीस या वयात तो जाणीवपूर्वक मार्क्सवादाकडे वळला. त्याविषयी त्याने प्रचंड वाचन अन् चिंतन केले. वयाच्या ३३ व्या वर्षी फाशी जाईपर्यंत तो मार्क्सवादीच होता. त्याचा बुद्धीप्रामाण्यवाद हा मार्क्सवादातून आला होता. (बुद्धीप्रामाण्यवाद या शब्दाऐवजी तो वास्तववाद असा शब्द वापरत असे.) स्वातंत्र्यप्राप्ती आणि क्रांतीकार्य यांसाठी साधन म्हणून भगतसिंगाने हिंसेचा वापर केला, हे खरे आहे; पण त्याने हिंसेचे उदात्तीकरण केले नाही किंबहुना ‘जनआंदोलनाचे धोरण म्हणून अहिंसा आवश्यक आहे, हिंसा नव्हे. जनक्रांती हिंसेच्या मार्गावर आधारली जाऊ शकत नाही; परंतु इतिहासाने व सत्ताधारी वर्गाने जर हिंसा लादली, तर मात्र क्रांतीकारकाने आवश्यक ती हिंसा करण्यास डगमगता कामा नये. एक भयानक; पण अत्यंत आवश्यक बाब म्हणून किंवा शेवटचा मार्ग म्हणून क्रांतीकारकांनी हिंसेचा आश्रय घ्यावा’, असे सांगितले.’

श्री. शरद बेडेकर (विचारवंतांचा ईश्वर, पृष्ठ क्र. ८०)

Leave a Comment