ऐन तारुण्यात क्रांतीकारकांनी देशासाठी केलेले क्रांतीकार्य आणि दिलेले बलीदान विसरू नका !

१. ‘१९.८.१९०८ या दिवशी खुदीराम बोस (वय १६ वर्षे) हा क्रांतीकारक `वन्दे मातरम्’ म्हणत फासावर गेला. त्याने मुझफ्फर येथे जिल्हा न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्यावर बाँब फेकला; परंतु नेम चुकला आणि दोन इंग्रज स्त्रिया ठार झाल्या.

२. सेनापती बापट हे अभियांत्रिकी शिक्षणासाठी इंग्लंडला गेले होते. तिथून ते बाँब निर्माण करण्यासाची विद्या शिकून आले आणि त्याचाच पहिला प्रयोग खुदीरामकडून झाला.

३. १८.४.१९१० या दिवशी अनंत कान्हेरे फाशी गेले. (वय २८ वर्षे) त्यांना साथ देणारे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या अनुक्रमे २० आणि २१ वर्षांच्या तरुणांना फाशी झाली.

४. १७.६.१९११ या दिवशी वांछिनाथ अय्यर, नीळकंठ अय्यर (२० वर्षे), शंकर कृष्ण अय्यर (१९ वर्षे), मुद्रास्वामी (१९ वर्षे) अशा तरुणांनी तीनवेल्लीचा जिल्हाधिकारी विल्यम एस्टफोर्ट अ‍ॅश याची मैने रेल्वेस्थानकावर हत्या केली. प्रत्यक्ष खून वांछीने केला आणि नंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. आपल्या तोंडून सहकार्‍यांची नावे बाहेर पडू नयेत; म्हणून धर्मराज अय्यर वय (२१ वर्ष) याने विष घेतले. वेंकटेश्वर पिल्लेने वस्तर्‍याने स्वतःचा गळा चिरला.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १८.१२.२००८)

Leave a Comment