भारतीय क्रांतीपर्वातील बाँबचा उगम आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची दूरदृष्टी !

‘ख्रिस्ताब्द १९०८ मध्ये सशस्त्र भारतीय क्रांतीकारकांच्या हाती एक संहारक अस्त्र गवसले, ते अस्त्र म्हणजे बाँब होय. हेमचंद्र दास यांनी रशियाहून या अस्त्राची कृती मिळवून आणली. सेनापती बापट यांना ती दिली. इंग्लंडमध्ये ‘इंडिया हाऊस’च्या पोटमाळ्यावर सावरकरांसमवेत अनेक प्रयोग करून पाहिल्यानंतर बाँबसारखे अस्त्र सिद्ध झाले. सेनापती बापटांच्या मनात त्याचा प्रयोग तिथेच ‘हाऊस ऑफ कॉमन्स’वर करण्याचा होता; पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले. तसे झाले असते, तर बाँब टाकणारा पकडला जाताच ‘हिंदी आहे’, हे समजले असते आणि संशयित म्हणून युरोपभरातल्या हिंदी विद्यार्थ्यांचा छळ झाला असता.’

– डॉ. सच्चिदानंद शेवडे (‘वाचा आणि गप्प बसा’, दैनिक तरुण भारत, बेळगाव आवृत्ती (७.९.२००८))

Leave a Comment