देशाला क्रांतीचा संदेश देणारे सरदार भगतसिंग यांचे स्फूर्तीगीत !

‘थोर राष्ट्रभक्त लाला लजपतराय यांच्यावर आरक्षकांनी केलेल्या अमानवी लाठीमाराचा सूड घेण्यासाठी साँडर्स या ब्रिटिश अधिकार्‍याला गोळ्या घालून ठार मारल्यामुळे आणि स्वातंत्र्याची मागणी देशाच्या मध्यवर्ती कायदेमंडळात पोहोचावी, यासाठी अधिवेशन चालू असतांना तेथे बाँबस्फोट केल्यामुळे भगतसिंग, सुखदेव अन् राजगुरु या थोर क्रांतीकारकांना ऐन तारुण्यात कारावास भोगावा लागला. देशाला क्रांतीचा संदेश देणार्‍या या राष्ट्रभक्तांना एकाच वेळी फाशी देण्यात आली.देशासाठी कारावास भोगतांना भगतसिंग यांनी सहकार्‍यांमध्ये राष्ट्रभक्ती वाढवणारे ‘मेरा रंग दे बसंती चोला’ हे स्फूर्तीगीत लिहिले. त्याचा अर्थ आजही राष्ट्राभिमान्यांना स्फूर्ती देणारा आहे !

मेरा रंग दे बसंती चोला

मेरा रंग दे बसंती चोला ।
इसी रंगमे रंगके शिवाने माँका बंधन खोला ।

यही रंग हल्दी घाटीमें खुलकरके था खेला ।
नव बसंतमें भारत के हीत वीरोंका यह मेला ।

दिलसे निकलेगी न मरकर भी वतन की उलफत ।
मेरी मिट्टीसेभी खुशबु-ए-वतन आयेगी ।

अर्थ :
माझी सर्व काया वसंती रंगात अंतर्बाह्य रंगू दे. याच रंगात रंगून (छत्रपती) शिवाजीने मातेला दास्यातून मुक्त केले !

(महाराणा प्रतापच्या वेळी) हळदीघाटात नव वसंतऋतूत याच रंगात रंगून वीरपुरुषांचा हा मेळा भारताच्या हितासाठी खेळला होता !

देशावरचे प्रेम माझ्या हृदयातून (मेल्यावरही) नाहीसे होणार नाही ! माझ्या राखेतूनसुद्धा देशाच्याच मातीचा सुगंध येत राहील !!’

– सरदार भगतसिंग

धन्य ते भगतसिंग आणि धन्य त्यांची माता !

‘क्रांतीवीर भगतसिंगांची आई त्यांच्या मृत्युदंडासमयी शेवटच्या भेटीसाठी तुरुंगात आली होती. तेव्हा भारतमातेचा, तसेच आपल्या आईचा हा सुपुत्र आपल्या आईला म्हणाला, ‘‘माँ, मैं मरने नहीं जा रहा हूं, मैं फॉंसिके घोडीपर बैठकर आजादिकी दुल्हन लाने जा रहा हूं ।’’

धन्य ते भगतसिंग ! धन्य त्यांची आई ! धन्य भारतमाता !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment