Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशपूजाविधीविषयी ‘ऑनलाईन’ प्रवचन

गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल यांनी गणपतीविषयी शास्त्रीय माहिती सांगितली.

सोलापूर येथील ‘सत्यदर्शन न्यूज चॅनल’च्या गणेशोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

पूजेमध्ये श्री गणेशाची मूर्ती शक्यतो डाव्या सोंडेची का असावी ?, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे, यांविषयी उपस्थितांना अवगत केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथील ‘स्वरांजली’ दूरचित्रवाहिनीवर गणेशोत्सवाविषयी विशेष मुलाखत प्रसारित !

या मुलाखतीचा २० लाखांहून अधिक दर्शकांनी लाभ घेतला. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत गणेशोत्सवाची शास्त्रीय माहिती पोचली.

धर्मरक्षण आणि पाखंडाचे खंडण म्हणून हिंदुविरोधी विचारांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश-विदेशात हिंदुविरोधी कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास निद्रिस्त हिंदूंना जागृत करून त्यांना अवगत करणे, सनातन हिंदु धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, याचे दायित्व आपल्यावर (हिंदुत्वनिष्ठांवर) आहे.

राज्यघटना ‘सेक्युलर’ (निधर्मी) असेल, तर अल्पसंख्यांकांना दिलेल्या सवलती रहित करायला हव्यात ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी ‘सेक्युलर’ शब्द घातल्यानंतर राज्यघटना पंथनिरपेक्ष झाली. जर राज्यघटना सर्वांना समान मानते, तर अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा भेदभाव का केला…

विशाळगडच्या समस्यांच्या विषयात लक्ष घालून पर्यावरण मंत्र्यांसमवेत बैठकीचे नियोजन करीन ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

‘ऐतिहासिक विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवणे, या गडाची माहिती देणारे फलक सर्वत्र लावणे, तसेच गडाचे सुशोभीकरण करणे आदी गोष्टींसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने…

राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण व्हा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

येणार्‍या काळात जेव्हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन यांच्या विरोधात भारताला युद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा साम्यवादी, तथाकथित धर्मनिरपेक्ष, चीन-अफगाणिस्तान समर्थक यांच्यापासून देश आणि धर्म यांचे रक्षण…

चिपळूण येथे १०० टक्के श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात करण्यात आले विसर्जन !

चिपळूण येथील गणेशोत्सवातील पाचव्या दिवशी श्री गणेशमूर्ती आणि गौरी यांचे विसर्जन वाशिष्ठी नदीच्या पात्रातील वहात्या पाण्यात करण्यात आले. मागील वर्षी नगर परिषदेकडून श्री गणेशमूर्ती जमा…

हिंदु संस्कृतीने विश्वबंधुत्वाचा, तर आतंकवादी आक्रमण करणार्‍यांच्या संस्कृतीने विश्व विध्वंसाचा संदेश दिला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक आणि हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ सप्टेंबरला आयोजित केलेल्या ‘हिंदुत्व हाच विश्वबंधुत्वाचा खरा आधार’ या विषयावरील ‘ऑनलाईन विशेष संवादा’त ते बोलत होते. सनातन संस्थेच्या कु. कृतिका…

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथे ‘ऑनलाईन’ प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या कु. टुपुर भट्टाचार्य यांनी…