Menu Close

अमळनेर (जळगाव, महाराष्ट्र) येथे १०० धर्मांधांकडून ३ गोरक्षकांना अमानुष मारहाण

५ धर्मांधांना अटक !

  • अल्पसंख्य म्हणवणार्‍या आणि बहुसंख्यांच्या जिवावर उठलेल्यांचा उद्दामपणा रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • कायद्याचा धाक नसणार्‍या धर्मांधांची मानसिकता जाणा ! अशा घटनांना कोणत्याही वृत्तवाहिन्या प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक  
प्रतिकात्मक चित्र

अमळनेर (महाराष्ट्र) – येथील गांधलीपुरा भागात गरीब नवाझ चौक येथे गोरक्षक बजरंग दल सेवा आणि गोरक्षा प्रमुख श्री. राजेश खरारे अन् श्री. हर्षल ठाकूर आणि श्री. दुर्गेश सोनावणे या  तिघांना १०० धर्मांधांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी धर्मांध मुसलमान आरोपी सलमान रफा, आकीब अली सय्यद, सोहेल शेख सोडेवाला, नवाज खाटीक आणि एजाज पठाण यांना अटक केली. श्री. हर्षल आणि श्री. राजेश यांनी आतापर्यंत गोहत्येसाठी गायींची तस्करी करणारी धर्मांधांची अनेक वाहने पकडून दिल्यामुळे त्यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण केल्याचे समजते. (हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये, यासाठी सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)

तिघे गोरक्षक दुचाकीवरून जात असतांना नवाब चौक येथे धर्मांधांनी त्यांची गाडी अडवली. गाडी अडवण्याचे कारण विचारताच ‘राजेश खरारे फार अधिक हिंदुत्व दाखवतो’, असे म्हणत धर्मांधांनी तिघांना मागे ओढून खाली पाडले आणि त्यांना लोखंडी साखळी, सळी आणि विटा यांद्वारे अमानुषपणे मारहाण केली. अन्य धर्मांधांनीही त्यांना मारहाण केले. या वेळी दुर्गेश तेथून पळून गेले. आरोपींनी हर्षल ठाकूर आणि राजेश खरारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी राजेश खरारे यांची आई आणि बहीण भांडण सोडवण्यासाठी आल्या; पण धर्मांधांनी त्यांनाही मारहाण केली. या घटनेच्या वेळी हर्षल ठाकूर यांच्याजवळ असलेले २० सहस्र रुपये गहाळ झाले. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचार्‍यांनी १६ जूनच्या पहाटे वरील ५ धर्मांध आरोपींना अटक केली. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करत आहेत.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News