बदायू (उत्तरप्रदेश) – येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्चच्या सायंकाळी घडली. घटनेनंतर पळून गेलेल्या साजिदला पोलिसांनी चकमकीत ठार केले. या गुन्ह्यात त्याचा भाऊ जावेद हाही सहभागी असून तो पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हत्येच्या या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी साजिद याच्या दुकानाची तोडफोड करून त्याला आग लावली, तसेच पोलिसांच्या चौकीवरही आक्रमण केले. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
१. येथील सिविल लाईन भागातील बाबा कॉलनीमध्ये ही घटना घडली. येथे साजिद याचे केशकर्तनालय असून त्याच्या समोरच विनोद कुमार यांचे घर आहे. येथे त्यांची पत्नी संगीता यांचे सौंदर्यवर्धनालय (ब्युटीपार्लर) आहे.
२. साजिद घटनेच्या दिवशी या घरात गेला होता. त्याने संगीताकडे पत्नी रुग्णालयात असल्याने कर्ज म्हणून५ सहस्र रुपयांची मागणी केली. संगीताने पैसे देण्याचे मान्य केले. त्यांनतर साजिद अस्वस्थ वाटत असल्याचे सांगून महिलेच्या मोठ्या मुलाला घेऊन घराच्या गच्चीवर पोचला.
३. संगीता चहा बनवण्यास गेल्यावर तिचा मोठा मुलगा आयुष (वय १४ वर्षे) याला गच्चीवर गळा चिरून ठार मारले. यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितल्यावर दुसरा मुलगा आहान (वय ६ वर्षे) पाणी घेऊन वर गेला असता साजिद याने आहानचा गळा चाकूने चिरल्याचे दिसले.
४. आहान मोठ्याने ओरडल्याने पियूष (वय ७ वर्षे) वर पोचला असता त्याला साजिदने पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्या हाताला दुखापत झाली. त्याने खाली येऊन आईला घटना सांगितली. तोपर्यंत साजिद आणि जावेद खाली येऊ लागले. त्यांच्या हातातील चाकू पाहून सर्व बाहेर पळाले.
५. बाहेर येऊन त्यांनी दार बाहेरून बंद केले आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन साजिदला पकडले, तर जावेद पळून गेला. साजिदला पोलीस गाडीतून घेऊन जात असतांना तो तेथून पळाला. तो येथून काही अंतरावरील जंगलात आढळून आला.
६. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने पोलिसांवर गोळीबार केला. यात एका पोलीस निरीक्षकाला गोळी लागली. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात साजिद ठार झाला. पोलीस पसार जावेदचा शोध घेत आहेत.
UP Police encounters Mohammad Javed for killing 2 Hindu brothers Ayush (11) and Ahan (8) in #Badaun.
5 Burning questions!
👉 Does #Ramzan support such crime?
👉 Is the killer and his community unsafe in India or is the case vice-versa?
👉 Do we need to enact a law in the… pic.twitter.com/AiTvBLaVGe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 19, 2024