Menu Close

वडोदरा (गुजरात) येथे मुसलमान मुलांनी २ गायींवर फेकले आम्ल !

मुसलमान मुले अल्पवयीन असतांना अशी क्रूर कृत्ये करत असतील, तर ती मोठी झाल्यावर जिहादी कृत्येच करतील, हे वेगळे सांगायला नको ! -संपादक 

वडोदरा (गुजरात) –  येथील एका दर्ग्याजवळ २ फेब्रुवारी या दिवशी काही अल्पवयीन मुसलमान मुलांनी २ गायींवर आम्ल फेकले. या आक्रमणातून १ गाय वाचली; मात्र दुसरी गाय गंभीर घायाळ झाली आहे. या प्रकरणी ५ मुसलमान मुलांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले. या मुलांनी आधी गायींना घेरून त्यांचा छळ केला आणि नंतर त्यांच्यावर आम्ल फेकले.

सौजन्य कॅपिटल टीव्ही उत्तरप्रदेश 

१. ही घटना वडोदरातील गोरवा भागात घडली. गायींवर आम्ल फेकल्यावर त्या घाबरून इकडे तिकडे धावू लागल्या. गायींवर झालेल्या या आक्रमणानंतर सुनील लिंबाचिया नावाच्या व्यक्तीने याविषयी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.

२. खून आणि प्राणी क्रूरता कायद्याच्या अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी गोरवा पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. ‘या अल्पवयीन मुलांनी हे कृत्य स्वतः केले कि त्यांच्यामागे अन्य कोणी आहे ?’, याचे अन्वेषण पोलीस करत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *