Menu Close

हिंदूंची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी स्वेच्छेने रिकाम्या करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा – के.एस्. ईश्‍वरप्पा

कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांची चेतावणी !

के.एस्. ईश्‍वरप्पा

बेळगाव (कर्नाटक) – हिंदूंची मंदिरे पाडून बनवलेल्या मशिदी स्वच्छेने रिकाम्या करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागले, अशी चेतावणी कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री के.एस्. ईश्‍वरप्पा यांनी दिली.

ते येथे हिंदु कामगारांच्या संमेलनात बोलत होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही ईश्‍वरप्पा यांनी ‘देशातील मंदिरांच्या जागी बांधलेली एकही मशीद सोडणार नाही’ असे विधान केले होते.

सौजन्य इंडिया टूडे 

ईश्‍वरप्पा पुढे म्हणाले की, मथुरेसह आणखी २ ठिकाणांचा विचार चालू आहे. न्यायालयाचा निर्णय एकदा येऊ द्या. आज असो वा उद्या, आम्ही मंदिरांचे बांधकाम चालू करू, याविषयी कुठलीही शंका नसावी.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *