Menu Close

गुजरातमध्ये मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य करणार्‍या ४ मुसलमानांना अटक

धर्मांध मुसलमान ! एरव्ही मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांना विरोध करणार्‍या हिंदूंना ‘मैत्रीला किंवा प्रेमाला रंग नसतो’, असा फुकाचा उपदेश करणारे आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ? – संपादक

वडोदरा (गुजरात) – वडोदरा पोलिसांनी मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य केल्याच्या प्रकरणी ४  मुसलमानांना अटक करण्यात आली आहे. याकीब अली शेख, नौमान शेख, मोहसीन पठाण आणि अबरार खान सिंधी अशी त्यांची नावे आहेत. याखेरीज पोलिसांनी इतर ९ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.  हे सर्व जण ‘आर्मी ऑफ मेहंदी’ नावाच्या ‘व्हॉट्सॅप ग्रुप’शी संबंधित आहेत.

या धर्मांधांनी गेल्या ५ मासांमध्ये किमान १५ हिंदु तरुणांना लक्ष्य करून त्यांचा छळ केला. ही धर्मांध टोळी मुसलमान तरुणी हिंदु तरुणासमवेत दुचाकी वाहनावरून जात असल्याचे दिसताच त्यांना थांबवून त्यांचा व्हिडिओ बनवतात आणि हिंदु तरुणाला मारहाण करतात. यासाठी धर्मांधांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘हुसैनी लष्कर’ नावाचा ५०० लोकांचा ‘व्हॉट्सॅप ग्रुप’ सिद्ध केला होता. पोलिसांना संशय येऊ नये,यासाठीआरोपी कुठलाही ‘व्हॉट्सॅप ग्रुप’ केवळ ३ ते ४ मास चालू ठेवतात आणि त्यानंतर तो गट बंद करून पुन्हा नवीन गट सिद्ध करतात. ‘हुसेनी लष्कर’ नंतर ‘आर्मी ऑफ मेहंदी’ आणि त्यानंतर ‘लष्कर-ए-आदम’ हे गट या अंतर्गत सिद्ध झाले होते. पोलीस या प्रकरणी पुढील अन्वेषण करत आहेत.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *