Menu Close

‘सुदर्शन न्यूज’च्या सूत्रसंचालिकेने शाकाहरी पदार्थाची मागणी केली असतांना पाठवला मांसाहारी पदार्थ !

पोलीस ठाण्यात ‘झोमॅटो’ आणि ‘नझीर फूड्स’ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

कनिका अरोरा

नोएडा (उत्तरप्रदेश) – ‘सुदर्शन न्यूज’ या हिंदी वृतवाहिनीच्या सूत्रसंचालिका कनिका अरोरा यांनी ‘झोमॅटो’ या ऑनलाईन मागणीनुसार खाद्यपदार्थ घरपोच करणार्‍या आस्थापनाच्या आणि ‘नझीर फूडस’ या दुकानाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. यात म्हटले आहे, ‘त्यांनी शाकाहारी पदार्थाऐवजी मला मांसाहारी पदार्थाचे वितरण केले. ‘पनीर रोल’ऐवजी ‘चिकन रोल’ पाठवले. यामुळे माझा धर्म भ्रष्ट झाला.’ कनिका यांनी वृत्तवाहिनीवर हे खाद्यपदार्थ आणि त्याचे देयक दाखवले.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *