Menu Close

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड !

  • पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांना ठार मारण्याची धमकी

  • पोलिसांच्या संरक्षणात होत आहे जीर्णोद्धार !

इंदूर (मध्यप्रदेश) – येथील चंदननगरातील शीतलामाता मंदिरात धर्मांध मुसलमानांनी तोडफोड करून तेथील हिंदूंना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

१. या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. येथे २ कामगार काम करत असतांना काही महिला तेथे पूजा करण्यासाठी आल्या. त्या वेळी राशिद, इम्रान आणि फिरोज तेथे आले. त्यांनी कामगारांना काम करण्यापासून रोखले आणि मारहाण केली. तसेच पूजा करण्यास आलेल्या महिलांशी गैरव्यवहार केला. त्यांनी महिलांना मंदिर हटवण्याची मागणी केली. तसे न केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी मंदिरात तोडफोड केली.

२. या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते तेथे गोळा झाले आणि नंतर पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी मंदिराजवळ मोठा बंदोबस्त ठेवला. पोलिसांच्या संरक्षणात जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. तसेच आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी मंदिर परिसरात अनेकदा मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तोडफोड केली जाऊ लागली आहे. जर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली नाही, तर येथे मोठे आंदोलन केले जाईल. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *