Menu Close

पाकिस्तान जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई करणार !

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या विरोधात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया घडवणार्‍या पाकिस्तानने त्याच्या देशातील आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ चालू करण्याची घोषणा केली. या कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. ही बैठक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही कारवाई नव्या जोमाने आणि निर्धाराने केली जाईल. यात जनतेलाही ससमवेत घेतले जाणार आहे.

पाकिस्तानमध्ये जिहादी आतंकवादी आक्रमणांत वाढ झाली आहे. तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) संघटनेने खैबर-पख्तूनख्वामध्ये आक्रमणे चालू केली आहेत. येथेे गेल्या ३ मासांमध्ये आतंकवादी आक्रमणांमध्ये १२७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *