Menu Close

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त वाहन फेरी

bhusaval_vahanferi
फेरीत सहभागी हिंदु धर्माभिमानी

भुसावळ : २२ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने भुसावळ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने भुसावळ शहरात १९ मे या दिवशी वाहन फेरी काढण्यात आली. जामनेर रोड येथील साईबाबा मंदिर येथे धर्मध्वजाचे पूजन करून शंखनादाने वाहन फेरीचा प्रारंभ झाला. धर्मध्वज पूजन हिंदु धर्माभिमानी सर्वश्री अभय राठोड, भूषण महाजन यांचा हस्ते करण्यात आले.

भगवे ध्वज घेऊन हर हर महादेव, जय श्री राम, जय भवानी, जय शिवाजी, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, आयेगा भाई आयेगा हिंदु राष्ट्र आयेगा या घोषणांद्वारे जनजागृती करण्यात येत होती. उपस्थित हिंदूंना सर्वश्री प्रशांत जुवेकर, उदय बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. या वाहन फेरीत ४० दुचाकी आणि १०० हिंदु धर्माभिमानी युवक उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *