Menu Close

बेंगळुरू येथे ‘अल् कायदा’च्या आतंकवाद्याला अटक

बेंगळुरू (कर्नाटक) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) येथून ‘अल् कायदा’चा आतंकवादी आरिफ याला अटक केली आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. गेल्या २ वर्षांपासून अल् कायदाच्या संपर्कात होता. बेंगळुरूमध्येच सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होता.

एन्.आय.ए.ने सांगितले की, आरिफ हा कट्टरपंथी आहे, तथापि तो आतापर्यंत कोणत्याही घटनेत सहभागी नाही. तो लवकरच इराण आणि अफगाणिस्तान येथे जाण्याच्या सिद्धतेत होता.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *