Menu Close

हरदोई (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी ३ मीटरपर्यंत बंधारा तोडला !

धर्मांधांचा आता ‘पूर जिहाद’ !

यापूर्वी आसाममध्ये धर्मांधांनी बंधारा तोडल्यामुळे पूर येथील १ लाख लोक बाधित झाले होते. आता असाच प्रकार देशात अन्यत्र करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न चालू आहे. ही भविष्यात येणार्‍या मोठ्या संकटाची चाहूल आहे. याविषयी देशातील निधर्मीवादी तोंड उघडतील का ? -संपादक

 

हरदोई (उत्तरप्रदेश) – येथे ५ धर्मांधांकडून रात्रीच्या सुमारास ३ मीटरपर्यंत बंधारा तोडण्यात आल्याची घटना घडली आहे. अजून काही प्रमाणात बंधारा तोडण्यात आला असता, तर येथे मोठा पूर आला असता. येथील शारदा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सतर्कता दाखवल्याने मोठी हानी टळली. विभागाचे अधिकारी येथे निरीक्षणासाठी गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. या प्रकरणी झीशान अली नावाच्या एका आरोपीला घटनास्थळीच पकडण्यात आले, तर उर्वरित आरोपी रक्शान शाह, सिकंदर शाह, वसीम खान, सरदार अली आणि मुदस्सिर अली यांचा पोलीस शोध घेत आहेत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *