Menu Close

कर्नाटकमधील दंगलीत घायाळ झालेल्या मुसलमान महिलेने हानीभरपाईचे पैसे काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकले

दंगलीत हिंदू घायाळ झाले असते, तर सिद्धरामय्या किंवा काँग्रेसचे अन्य नेते कधी त्यांना हानीभरपाई देण्यास गेले असते का ? आतापर्यंत काँग्रेसने कधी असे केले आहे का ? -संपादक, दैनिक सनातन प्रभात 

सिद्धरामय्या यांनी देऊ केली होती हानीभरपाई !

काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या (डावीकडे)

बागलकोट (कर्नाटक) – येथे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी दंगलीच्या प्रकरणी घायाळ झालेल्या मुसलमान महिलेला २ लाख रुपये हानीभरपाई देऊ केल्यावर तिने ते पैसे सिद्धरामय्या यांच्या वाहनावर फेकून दिले. या महिलेने ‘शहरातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली करा’, असे त्यांना सुनावले. या दंगलीत ४ मुसलमान घायाळ झाले होते. त्यांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्याची घोषणा सिद्धरामय्या यांनी केली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *