Menu Close

बेंगळुरू येथे पाकिस्तानला सैन्याविषयी गोपनीय माहिती पुरवणार्‍या शराफुद्दीन याला अटक

शराफुद्दीन

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक पोलीस आणि सैन्यदलाचा गुप्तचर विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये सैन्याविषयीची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणार्‍या एका टोळीतील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. शराफुद्दीन असे आरोपीचे नाव असून तो केरळच्या वायनाड जिल्ह्यात रहाणारा आहे.


त्याच्या अन्य साथीदारांचा शोध चालू आहे. ही टोळी दूरभाषद्वारे पाकिस्तानला माहिती पुरवत होती. शराफुद्दीनकडून २ सहस्र १४४ सीम कार्ड, ५८ सीम बॉक्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *