Menu Close

चितोडगड (राजस्थान) येथे रा.स्व. संघाच्या संयोजकाची हत्या

हिंदु संघटनानांकडून आंदोलनानंतर जमावबंदी  

चितोडगड (राजस्थान) – येथे ३१ मेच्या रात्री अज्ञतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  संयोजक रत्न सोनी यांची हत्या केली. यानंतर येथे हिंदु संघटनांकडून येथील चौकात आंदोलन करण्यात आले. काही वेळानंतर येथे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी येथे जमावबंदी लागू केली आहे. दुचाकी वाहनांवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी तलवारी आणि लोखंडी सळ्या यांद्वारे रत्न सोनी यांच्यावर आक्रमण करून पलायन केले. सोनी यांना घायाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना उदयपूर येथे नेण्यास सांगण्यात आल्यावर वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सोनी बजरंग दलाशी संबंधित होते. त्यांचे वडील माजी नगरसेवक आहेत.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *