Menu Close

भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

हिंदु संघटनांकडून ‘भिलवाडा बंद’चे आवाहन

हत्या झालेला तरुण आदर्श तापडिया (चौकटीत)

भिलवाडा (राजस्थान) – येथे आदर्श तापडिया या २२ वर्षीय तरुणाची १० मेच्या रात्री धर्मांधांनी चाकू खुपसून हत्या केल्याने तणाव निर्माण झाला. पैशांवरून झालेल्या या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आदर्श हा ‘हिंदु जागरण मंच’शी संबंधित होता. या घटनेनंतर विश्‍व हिंदु परिषद, भाजप आणि हिंदु जागरण मंच यांनी ११ मे या दिवशी ‘भिलवाडा बंद’चे आवाहन केले होते. या वेळी हिंदु संघटनांकडून दुचाकी फेरी काढण्यात आली होती. या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे इंटरनेट सेवा २४ घंट्यांसाठी बंद करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना कह्यात घेतले आहे. या हत्येमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

१. विश्‍व हिंदु परिषदेचे गणेश प्रजापत म्हणाले की, भिलवाडामध्ये वारंवार जातीय घटना घडत आहेत. तरुणाच्या कुटुंबाला ५० लाख रुपये देण्यात यावे आणि सर्व आरोपींना अटक केली जावी. जोपर्यंत आरोपींना अटक केली जाणार नाही, तोपर्यंत आदर्श याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत.

२. भाजपचे आमदार विठ्ठल अवस्थी म्हणाले की, ही अत्यंत लाजिरवाणी आणि पोलीस अन् सरकार यांना झोपेतून जागे करणारी घटना आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *