Menu Close

राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – कालीचरण महाराज

कालीचरण महाराज

अलीगड (उत्तरप्रदेश) – या देशात लाखो मंदिरे पाडली गेली. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदु राष्ट्र बनले नाही, तर हे होतच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते, असे विधान कालीचरण महाराज यांनी अलीगडमधील संत संमेलनात केले. काही मासांपूर्वी कालीचरण महाराज यांनी म. गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.

हिंदूंनी धर्माच्या आधारे मतदान करावे !

कालीचरण महाराज पुढे म्हणाले की, हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. केवळ सनातन धर्म हा एकच धर्म आहे, भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती हे धर्म नाहीत. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान देश आपल्या हातून गेले आणि ते इस्लामी देश बनले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *