Menu Close

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

नवी देहली – राजधानी देहलीतील मयूर विहार परिसरात भाजपचे जिल्हा मंत्री जीतू चौधरी यांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. जीतू चौधरी हे मयूर विहारमधील त्यांच्या घरातून बाहेर येताच गुंडांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला.

कुटुंबियांनी जीतू चौधरी यांना गंभीर अवस्थेत नोयडा येथील मेट्रो रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना ४-५ गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. भरदिवसा भाजप नेत्यावर गोळ्या झाडल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. या हत्या प्रकरणी पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *