Menu Close

उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्यात येणार !

बंदीवानांना मानसिक शांतता लाभण्यासाठी सरकारचा प्रयत्न !

उत्तरप्रदेश सरकारचा हा निर्णय अभिनंदनीय आहे. सरकारने यांसह आता बंदीवानांना साधना शिकवून त्यांच्या गुन्हेगारी मनोवृत्तीत पालट करण्यासाठीही प्रयत्न केला पाहिजे. शिक्षा भोगल्याने व्यक्तीमध्ये पालट होतो, असे दिसून येत नाही; कारण यातील बरेच जण पुन्हा गुन्हेगारी कृत्ये करतात. त्यामुळे त्यांची ही वृत्तीच नष्ट होणे आवश्यक आहे !

 

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. बंदीवानांना मानसिक शांतता लाभण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे कारागृह मंत्री धर्मवीर प्रजापती यांनी हा आदेश दिला आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *