Menu Close

(म्हणे) ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्यास सिद्ध आहे; मात्र पंतप्रधान मोदी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आश्‍वासन द्यावे !’

दिग्दर्शक विनोद कापरी यांची मागणी !

  • दिग्दर्शक विनोद कापरी यांना असा चित्रपट निर्माण करण्याचा विचार यापूर्वी का आला नाही ? आता ‘द कश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडल्यावर त्यांना गुजरात दंगलीची आठवण होणे, हा हिंदुद्वेष आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • दिग्दर्शक विनोद कापरी यांच्यासारख्या हिंदुद्वेषींच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

पंतप्रधान मोदी (डावीकडे) दिग्दर्शक विनोद कापरी (उजवीकडे)

मुंबई – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक विनोद कापरी यांनी ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्याची सिद्धता दर्शवली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट करून काही निर्माते या चित्रपटाच्या निर्मित्तीसाठी सिद्ध असल्याचेही सांगितले.

तथापि यासाठी कापरी यांनी ‘पंतप्रधान ज्या पद्धतीने भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांविषयी बोलले, तशी भूमिका त्यांनी ‘द गुजरात फाइल्स’ या चित्रपटाविषयीही घ्यावी’, अशी अट ठेवली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *