Menu Close

होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

यवतमाळ येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलीस प्रशासनाकडे मागणी !

डावीकडून विनोद अरेवार, मनोज औदार्य, दत्तात्रय फोकमारे आणि सूरज गुप्ता पोलिसांना निवेदन देतांना

यवतमाळ – होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने १४ मार्च या दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. धरणे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी त्यांनी ‘होळीच्या कालावधीत अपप्रकार करणार्‍यांवर कारवाई करू’, असे आश्वासन दिले.

निवेदन देतांना श्रीराम जन्मोत्सव समितीचे मनोज औदार्य, बजरंग दलाचे श्री. सूरज गुप्ता, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे श्री. विनोद अरेवार आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रेय फोकमारे आणि कैलास सुरसे उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *