Menu Close

विद्यार्थिनीने हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात पोस्ट केला पाकिस्तानी ध्वज !

सरकारने अशांना देशद्रोही घोषित करणारा कायदा करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे. तरच असे प्रकार थांबतील ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने  हिजाबच्या समर्थनार्थ ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात पाकिस्तानी ध्वज पोस्ट केला. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीवर गुन्हा नोंद करून तिला महाविद्यालयातून काढून टाकण्याची मागणी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने शिवमोग्गास्थित ‘सह्याद्री सायन्स कॉलेज’ परिसरात मोर्चा काढला आणि विद्यार्थिनीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी कायदेशीर मार्गदर्शन घेत असल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने सांगितले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *