Menu Close

‘योगी मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणार्‍या हिंदूवर धर्मांधांचे जीवघेणे आक्रमण !

  • धर्मांधांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रती किती द्वेष आहे, हेच यातून दिसून येते ! अशांवर प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक !
  • ‘जय श्रीराम’च्या घोषणा भारतात न द्यायला हा देश पाकिस्तान आहे का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

दरियाबाद (उत्तरप्रदेश) – बाराबंकी जिल्ह्यातील दरियाबाद येथील गुलचप्पा कला या गावात गुड्डू रावत या युवकाने ‘योगी-मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे गावातील माजी सरपंच अलीम याच्या सलीम आणि अदीम या २ मुलांनी रावत यांच्यावर जीवघेणे आक्रमण केले. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. रावत यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

१. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गावात काही लोकांमध्ये याविषयी चर्चा चालू होती. त्या वेळी पान मसाल्याच्या टपरीवर बसलेले गुड्डू रावत यांनी ‘योगी-मोदी झिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या.

२. २८ फेब्रुवारीला सायंकाळी रावत घरी जात असतांना सलीम आणि अदीम यांनी रावत यांना बेदम मारहाण केली अन् त्यांना तशाच अवस्थेत तेथे ठेवून ते पसार झाले.

३. याची माहिती मिळताच रावत यांच्या कुटुंबियांनी संबंधितांच्या अटकेची मागणी केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *