Menu Close

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

श्रीनगर – येथील बंदीपोरा भागात भारतीय सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना अटक केली. महंमद, इरशाद हुसैन आणि आशिक हुसैन अशी त्यांची नावे असून ते लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून शस्त्रे आणि १० किलो स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. त्यांच्यावर पाकच्या आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचाही आरोप आहे. या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *