Menu Close

पाकमध्ये सत्र न्यायालयाच्या आवारातून दिवसाढवळ्या हिंदु महिलेचे अपहरण

पाकमधील हिंदूंची ही स्थिती पालटण्यासाठी भारत सरकार कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात येतो ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

नवी देहली – पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोटच्या सत्र न्यायालयाबाहेर एका हिंदु महिलेला दिवसाढवळ्या सर्वांसमोरून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ भाजपचे नेते मनजिंदरसिंह सिरसा यांनी ट्विटरवर ट्वीट करत प्रसारित केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना ‘मेंशन’ही (संबंधित व्यक्तीला उद्देशून) केले आहे.

या महिलेचे  होत असतांना ती उपस्थित लोकांकडे साहाय्याची मागणी करत होती. तरीसुद्धा कुणीही तिच्या साहाय्यासाठी धावून जात नव्हते, असे संबंधित व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *