Menu Close

अफगाणिस्तानमधील पवित्र गुरुद्वारावरील ध्वज तालिबान्यांनी हटवला !

पाकचे बटीक झालेले खलिस्तानवादी याविषयी गप्प का आहेत कि त्यांना तालिबान्यांची कृती मान्य आहे ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या पकतिया प्रांतातील थाल साहिब गुरुद्वारावर लावण्यात आलेला पवित्र ध्वज तालिबान्यांनी हटवला. तालिबानने मात्र त्याच्याकडून ध्वज हटवण्यात आल्याचा दावा फेटाळला आहे. (अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत अनेक गुरुद्वारांवर आणि शिखांवर तालिबान्यांकडून आक्रमणे झालेली असतांना यावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) शिखांसाठी हा गुरुद्वारा पवित्र मानला जातो; कारण या गुरुद्वारामध्ये शीख पंथाचे संस्थापक गुरुनानक येऊन गेले होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *