Menu Close

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरी झालेल्या पार्टीची ध्वनीचित्रफीत खरी असल्याचा अहवाल

मुंबई : निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्या घरी वर्ष २०१९ मध्ये झालेल्या पार्टीची ध्वनीचित्रफीत खरी असल्याचा अहवाल न्याय वैद्यक प्रयोगशाळेने (फॉरेन्सिक लॅबने) दिला आहे. या पार्टीत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित होत्या. ध्वनीचित्रफीतीमध्ये ही मंडळी झिंगत असलेली दिसली. अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्सीबीने) ‘आमचा या ध्वनीचित्रफीतीशी संबंध नाही’, असे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणी नवी तक्रार प्रविष्ट होण्याची शक्यता आहे. याविषयी देहलीमध्ये २८ सप्टेंबर या दिवशी बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Source : दैनिक सनातन प्रभात

चार अभिनेत्रींचे भ्रमणभाष अमली पदार्थविरोधी पथकाच्या कह्यात

मुंबई : अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.ने) अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांचे भ्रमणभाष कह्यात घेतले आहेत, अशी माहिती पथकाच्या अधिकार्‍यांनी दिली. दीपिका पदुकोण यांची व्यवस्थापिका करिश्मा प्रकाश, सिमोन खंबाटा आणि जया साहा यांचेही भ्रमणभाष कह्यात घेण्यात आले आहेत. अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूशी अमली पदार्थांचा संबंध आहे का, यादृष्टीने अन्वेषण चालू आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Trending Topics

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *