Menu Close

हिंदु पत्नी, मेहुणी आणि सासू यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांवर बलात्कार करणारा नूर हसन याला अटक

धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून विवाह केल्यावर काय होते ?, याचे हे एक अमानुष उदाहरण होय ! हिंदु तरुणींनी अशा घटनांकडे पाहून तरी जागरूक व्हावे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु तरुणांना धर्मशिक्षण देऊन त्यांचे रक्षण करावे !

पानीपत (हरियाणा) : येथे २७ वर्षीय नूर हसन याने स्वतःची हिंदु पत्नी, मेहुणी आणि सासू यांची हत्या करून त्यांच्या मृतदेहांवर बलात्कार केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

१. ५ सप्टेंबरला पत्नी आणि मेहुणी यांची हत्या केल्यानंतर त्याने दोघींचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले. पत्नीचा मृतदेह रेल्वे रुळावर, तर मेहुणीचा नाल्यामध्ये फेकला. फेकण्यापूर्वी त्यांचा चेहरा ओळख पटू नये; म्हणून जाळला होता. त्यानंतर तो ८ सप्टेंबरला पत्नीच्या गावी गेला आणि तेथे त्याने सासूचीही गळा दाबून हत्या केली अन् तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

२. पत्नीचे अवैध संबंध असल्याच्या संशयावरून हसन याने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंदु पत्नी ही त्याची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीपासून त्याला ३ मुले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *