Menu Close

पाकच्या इंडोनेशियातील माजी राजदूताने विकली तेथील दूतावासाची इमारत

इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकच्या इंडोनेशियात असलेल्या राजदूतावासाची इमारत माजी राजदूताने सरकारच्या अनुमतीविना विकल्याची घटना १९ वर्षांनंतर समोर आली आहे. निवृत्त मेजर जनरल सय्यद मुस्तफा अन्वर असे या माजी पाक राजदूताचे नाव आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे पाकच्या दूतावासाची इमारत होती. अन्वर वर्ष २००१-०२ या कालावधीत तेथे राजदूत असतांना त्यांनी ही इमारत विकली. यामुळे पाकला २२ कोटी रुपयांची हानी झाली. त्यांनी पाक सरकारला न विचारताच इमारत विक्रीचे विज्ञापन दिले होते. हे प्रकरण आता पाकच्या न्यायालयात पोचले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *