Menu Close

क्षुल्लक कारणावरून गौहत्ती (आसाम) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या

  • अशा घटनांविषयी पुरस्कार वापसी टोळी बोलणार नाही, हे लक्षात घ्या !
  • अशी एखाद्या धर्मांधांची बहुसंख्यांकांपैकी कुणी हत्या केली असती, तर लगेच त्यांना तालिबानी ठरवण्यात आले असते !

गौहत्ती (आसाम) : येथील एक हिंदु तरुण रितुपर्णा पेगु याचा गळा चिरून हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दुलाल अली, इब्राहिम अली, इब्राहिम याची आई मनोवर खातुन, हुसैन अली आणि अरमान अली या धर्मांधांना अटक केली. एका खुर्चीवरून झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

येथील ‘अरमान होम फर्निशिंग’ नावाच्या दुकानात रितुपर्णा आणि हुसैन अली दोघे बोलत होते. तेव्हा त्यांच्यात एका खुर्चीवरून वाद झाला. यावर रितुपर्णा याने हुसैन याच्या कानफटात मारली. त्यानंतर हुसैन यांनी त्याच्या कुटुंबियांना बोलवले आणि त्यांनी रितुपर्णा याला मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले, तसेच त्याचा गळा चिरला. यात रितुपर्णा याचा मृत्यू झाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *