Menu Close

जगामध्ये काहीही झाले, तरी चीन आणि पाक यांची मैत्री कायम राहील ! – शी जिनपिंग

चीनने त्याच्या देशातील १० लाख उघूरांचा छळ केला, त्यांना उद्या ठार केले, तरी पाक ही मैत्री कायम ठेवणार, हे भारतातील पाकप्रेमींनी लक्षात ठेवावे !

बीजिंग (चीन) : आंतरराष्ट्रीय स्थितीमध्ये कोणताही पालट होत असला, तरी  आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. चीन आणि पाकिस्तान यांची मैत्री नेहमीच कायम राहील. मानवता आणि लोकांचे भले होण्यासाठी आम्ही जगासमोर एक आदर्श सादर करू, असे प्रतिपादन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या सन्मानासाठी येथे आयोजित कार्यक्रमात केले. अल्वी म्हणाले की, पाक आणि चीन यांच्यातील मैत्री ऐतिहासिक आहे आणि दोन्ही देशांचे लोक हे हृदयापासून अनुभवत आहेत.

पाकमध्ये वाढणार्‍या कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी चीन ३ लाख मास्क, १० सहस्र संरक्षक सूट आणि ३० कोटी रुपये देणार आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *