Menu Close

गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा आणि मुख्य हवालदार रतनलाल यांच्या मारेकर्‍यांवर कारवाई करा !

‘हमारा देश’ संघटनेचे बेळगाव येथील पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन

निवेदन देण्याच्या प्रसंगी उपस्थित ‘हमारा देश’ संघटनेचे कार्यकर्ते

बेळगाव : देहली येथील हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा आणि मुख्य हवालदार रतनलाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी मारेकर्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी २ मार्च या दिवशी ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांना देण्यात आले. या वेळी श्री. व्यंकटेश शिंदे, मल्लिकार्जुन कोकणी यांसह हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर उपस्थित होते. ‘सार्वजनिक आणि बाजारपेठेतील मालमत्तेची हानी करणार्‍या दंगलखोरांना त्वरित गजाआड करून त्यांना कठोर शिक्षा करावी’, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *