Menu Close

काश्मीर सूत्रावर भारताला पाठिंबा देणार्‍या देशावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करू : पाकिस्तानचे मंत्री

पाकिस्तानचे मंत्री अली अमीन गंडापूर यांची पोकळ धमकी

भारतानेही पाककडून येणार्‍या अशा धमक्यांना भीक न घालता थेट कृती करून पाकला धडा शिकवावा !

पाकिस्तानचे मंत्री अली अमीन गंडापूर

लाहोर : काश्मीरच्या सूत्रावर जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यास पाकला नाईलाजाने युद्ध करावे लागेल. तसेच जो देश या प्रकरणी भारताचे समर्थन करेल, त्याला आम्ही आमचा शत्रू मानू आणि त्या देशावरही क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करू, अशी धमकी पाकिस्तानचे मंत्री अली अमीन गंडापूर यांनी दिली. (पाक सैन्याच्या प्रवक्त्यांनी ‘भारताचे सैन्यप्रमुख युद्धखोरीची भाषा वापरतात. त्यांनी दायित्वाने बोलायला हवे’, असे विधान नुकतेच केले होते. मग पाकच्या मंत्र्यांनी आता दिलेली ही धमकी म्हणजे युद्धखोरीची भाषा नव्हे का ? पाकच्या मंत्र्यांनी असे बोलणे दायित्वतेचे लक्षण आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी वरील धमकी दिली. पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित केल्यानंतर पाकच्या मंत्र्यांकडून वारंवार अशा प्रकारच्या धमक्या आणि चेतावणी देण्यात येत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *