Menu Close

जहानाबाद (बिहार) येथे धर्मांधांकडून झालेल्या गोळीबारात एक हिंदू ठार

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या तोडफोडीचे प्रकरण

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! हिंदूंना असहिष्णु म्हणणारे अशा घटनांच्या वेळी कुठल्या बिळात लपतात ?

जहानाबाद (बिहार) : येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जनाच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीमुळे मूर्तीची तोडफोड झाली होती. यानंतर येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. तरीही धर्मांधांनी घटनेच्या दुसर्‍या दिवशी दगडफेक आणि गोळीबार केला. यात विष्णु कुमार या तरुणाचा मृत्यू झाला, तर मिथुन नावाच्या तरुणाच्या पायाला गोळी लागल्याने तो घायाळ झाला. या व्यतिरिक्त ६ जण घायाळ झाले. यात काही पोलिसांचाही समावेश आहे. धर्मांधांनी एका दुकानालाही आग लावली. या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी ४० जणांना अटक केली आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *