Menu Close

‘बिग बॉस १३’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रसार ! – सामाजिक माध्यमांतून टीका

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने या विरोधात पाऊल उचलून संबंधितांवर कारवाई करणे संस्कृतीप्रेमींना अपेक्षित आहे !

मुंबई : ‘कलर्स’ या खासगी हिंदी दूरचित्रवाहिनीवरील ‘बिग बॉस’ कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये अश्‍लीलता पसरवण्यासह ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे. या कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीवर घाला घातला जात आहे. या कार्यक्रमावर बंदी घालण्याचीही मागणी केली जात आहे. या कार्यक्रमामध्ये काश्मिरी मुसलमान पुरुष मॉडेल आणि हिंदु तरुणी यांना एका पलंगावर झोपण्यास सांगण्यात आले आहे.

या सत्राच्या पूर्वीच यात सहभागी होणार्‍यांना पलंगावर समवेत झोपणारा जोडीदार निवडण्यास सांगण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सलमान खान करत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *